नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शुल्कवाढीचा निर्णय घेतला असून अखेर दरपत्रक जाहीर केले आहे. यामुळे बी.ए., बी.कॉम. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शुल्कापोटी सात हजारांवर शुल्क भरावे लागणार आहे. विद्यापीठाने दरवर्षी ७ टक्के शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षीपासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीवरील स्थगिती उठवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. आता विद्यापीठाने शुल्कवाढीचे दरपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे.

विद्यापीठाने २०१६ पासून प्रवेश आणि परीक्षा शुल्कात कुठलीही शुल्कवाढ केली नाही. संस्थाचालकांकडून सातत्याने शुल्कवाढीची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीवरील स्थगिती उठवण्याचा प्रस्ताव सादर करीत, ती स्थगिती उठवण्यात आली. त्यानुसार शुल्क निर्धारण समितीद्वारे २० टक्के शुल्कवाढ व पुढे दरवर्षी ७ टक्केप्रमाणे शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. पुढील वर्षापासून दरवर्षी ७ टक्के शुल्कवाढीला मंजुरी दिली आहे.

high court order railway administration
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल
Financial fraud , students , educational institution,
ठाण्यात शैक्षणिक संस्थेकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक
youth who attacked builder gets 10 year jail
बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे
prashant kishor
Prashant Kishor : विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अखेर बिनशर्त जामीन मंजूर, नेमकं काय घडलं?

हेही वाचा >>> Talathi Recruitment: भावी तलाठींची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला, प्रजासत्ताक दिनापर्यंत नियुक्तीपत्रे मिळणार; असे राहणार पुढील टप्पे…

यानुसार आता सर्वाधिक प्रवेश असणाऱ्या बी.ए., बी.कॉम. पदवी या अभ्यासक्रमांना शिकवणी शुल्क म्हणून ७ हजारांवर शुल्क तर जनसंवाद विषयात पदवी घेण्यासाठी २० हजारांवर शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा बसणार आहे. शिक्षण शुल्क व अन्य शुल्कात वाढ करण्यात आली असली तरी शिष्यवृत्ती लागू नसलेल्या व वाढीव शुल्क भरू न शकणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क वाढीचा आग्रह करू नये, अशी ताकीद अधिसूचनेतून देण्यात आली आहे.

असे आहे नवीन शुल्क

कला आणि सामाजिक शास्त्र (पदवी) – ७,०५७

जनसंवाद पदव्युत्तर – २०,६०८

वाणिज्य (पदवी) – ७,०५७

बी.बी.ए., बी.कॉम. – ९,५१२

बी.कॉम. (सीए) – ९,५१२

वाणिज्य(पदव्युत्तर) – ८,८२०

एमसीएम – ११,८८६

खादी प्रोडक्शन – २२,०५१

एमएस्सी होमसायन्स – १७,८३३

Story img Loader