वर्धा : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने फार्मसी महाविद्यालयांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून तीस ऑगस्टपर्यंत मुदत मिळविली. मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया प्रश्नांकित झाली होती. सीईटी कक्षाकडून बहुतांश सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू तर बी.फार्म बाबत हालचाल नव्हती. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत पडले होते. आता प्रतीक्षा संपली आहे.
हेही वाचा – भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी नागपुरात ठाकरे गट आक्रमक, आज निषेध आंदोलन
११ ते २० जुलै दरम्यान ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करता येणार आहे. सीईटी कक्षाने तशी सूचना काढली. चार वर्षीय बी. फार्म तसेच सहा वर्षीय फार्मा डी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी अर्ज सादर करता येतील. येथील आयपर फार्मसीचे प्राचार्य डॉ. गंजीवाले म्हणाले की तूर्तास प्रवेश अर्ज सादर करण्यास मुभा मिळाली आहे. न्यायालयीन निकालानंतर मान्यता प्राप्त तसेच उर्वरित महाविद्यालयांसाठी प्रवेश निश्चिती होण्याची शक्यता आहे.