चंद्रपूर: वेगळ्या विदर्भाबाबत अनोख्या आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेल्या बाबाराव मस्की यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी मस्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजुरा तालुक्यातील बाबाराव मस्की हे कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात. तसेच ते अनोखे आंदोलनामुळे प्रसिध्द आहे. मस्की यांनी नुकतेच सोशल मिडीयावर फडणवीस व मुनगंटीवार यांच्यावर टीका करीत ठार मारण्याची धमकी दिली आहे. या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बाबाराव मस्की यांच्याविरोधात राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा… भंडारा: तरूणीचा ‘विवस्त्र’ डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; डान्स हंगामाच्या नावावर अश्लिल नृत्य

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, संजय जयपूरकर, संदीप पारखी बाबुराव जिवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात बाबाराव मस्की यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास राजुरा पोलीस करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babarao maski threatened by social media post to kill devendra fadnavis and sudhir mungantiwar chandrapur rsj 74 dvr