लोकसत्ता टीम
नागपूर : प्रियकरासोबत गेल्या सात महिन्यांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी अविवाहित तरूणी गर्भवती झाली. तिने बाळाला जन्म दिला. बदनामीच्या भीतीने नवजात बाळाला बोले पेट्रोल पम्पजवळील एका झाडाखाली सोडून पळ काढला. कडाक्याच्या थंडीने बाळाचा मृत्यू झाला.
अंकिता (बदललेले नाव) ही २१ वर्षीय तरुणी मध्यप्रदेशची असून तिचे गावातील राजेश नावाच्या युवकाशी प्रेमसंबंध होते. दोघांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. गावात बदनामी होईल किंवा कुटुंबीय हाणामारी करतील या भीतीने ती गेल्या सप्टेबर महिन्यात प्रियकर राजेशसोबत पळून आली. दोघेही नागपुरातील अग्रवाल कुटुंबियांकडे घरकाम करण्याच्या कामावर लागले.
आणखी वाचा-झाडावर तीस फूट उंचीवर आढळला मृत बिबट्या, हृदय घाताने मृत्यू झाल्याची शक्यता
राजेश हा कामानिमित्त हैदराबादला निघून गेला. तर अंकिताची प्रसुतीची वेळ आल्यावर तिने एका अन्य काम करणाऱ्या महिलेची मदत घेतली. ४ जानेवारीला अंकिताची घरातच प्रसुती करण्यात आली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या बाळाचा जन्माची लपवणूक करून पुन्हा गावी जाण्याची योजना तरुणीची होती. त्यामुळे तिने मध्यरात्रीच्या सुमारास बोले पेट्रोलपम्पजवळील एका झाडाखाली तिने बाळाला फेकले आणि पळ काढला. रात्रभर कडाक्याच्या थंडीने त्या बाळाचा जीव गेल्याची चर्चा आहे.
अशी घटना आली उघडकीस
दुसऱ्या दिवशी सकाळी नवजात बाळ मृतावस्थेत नागरिकांना दिसले. नागरिकांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृत बाळाला ताब्यात घेतले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाच्या मातेचा शोध घेतला. त्या तरुणीवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते बाळ मृत जन्मास आले की बाळाचा खून करण्यात आला, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. तरुणीचा प्रियकर मात्र सध्या फरार असल्याची माहिती आहे.