श्वेता सावळेच्या टोळीचा आणखी एक प्रताप

नागपूर : पतीचा खून झाल्यानंतर विधवा महिलेचे एका नातेवाईकाशी सूत जुळले. या प्रेमसंबंधातून तिला गर्भधारणा झाली. ती गर्भपात करण्याच्या तयारीत असताना श्वेता सावळे च्या टोळीने तिची प्रसूती करून नवजात बाळाची परराज्यात पाच लाख रुपयांत विक्री केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने डॉक्टर, नर्ससह पाच जणांवर गुन्हे दाखल केले.

हेही वाचा >>> नागपूर : पती,पत्नी आणि ‘ती’च्या मध्ये पडले पोलीस! तीन आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचवले

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Kuwait Bank Fraud: Kerala Nurses Under Scrutiny
Kerala Nurses Fraud : १४०० नर्सेस, ७०० कोटी आणि गल्फ बँक… कुवेतमधील अर्थिक घोटाळ्याचे काय आहे केरळ कनेक्शन?
allu arjun case filled
अल्लू अर्जुनवर का झाला गुन्हा दाखल? प्रीमियरदरम्यान महिलेच्या मृत्यूचं प्रकरण काय आहे?

सूत्रांच्या माहितीनुसार, कोराडीमध्ये राहणारी ३० वर्षीय पीडित महिलेच्या पतीचा खून झाला. तेव्हापासून ती एकटी राहत होती. नातेवाईक असलेला विवाहित युवक तिच्या घरी यायला लागला. त्याची पत्नीसुद्धा प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यामुळे तोसुद्धा एकटा होता. त्यांचे सूत जुळले. दोघांनी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिला गर्भवती झाली. ती सप्टेबर २०२१ मध्ये आरोपी डॉ. नितेश मौर्य (३७ रा.मनीष नगर, सोमलवाडा) याच्या रुग्णालयात गेली. तेथे रेखा पुजारी (रा. नारा रोड, निर्मल कॉलनी) या परिचारिकेने तिला विश्वासात घेतले. डॉ. मौर्य आणि रेखा यांनी या महिलेला नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख श्वेता सावळे ऊर्फ आयशा खान हिच्याकडे पाठविले. आयेशाचा पती मकबूल खान, दलाल सचिन रमेश पाटील यांनी तिला सूनेसाठी बाळ दत्तक घ्यायचे असल्याचे सांगून बाळाला जन्म देण्यास भाग पाडले. मार्च २०२२ मध्ये आयेशाने या महिलेला बालाघाटमधील एका रुग्णालयात बळजबरी शस्त्रक्रिया बाळ काढले व अवघ्या दोन दिवसांच्या बाळाला परप्रांतात पाच लाखांत विकले.

हेही वाचा >>> अभ्यासाचा ताण, सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने संपविले जीवन

असा लागला छडा… गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी नवजात बाळांच्या विक्रीची माहिती गोळा केली. त्यात आयेशाच्या टोळीने आणखी बाळाची विक्री केल्याचे लक्षात आले. संकपाळ यांनी लगेच डॉ. सुनील मौर्य आणि रेखा पुजारी यांची चौकशी केली. रेखा हिने आयेशाच्या मदतीने बाळ विकल्याची कबुली दिली. 

Story img Loader