लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्धा : जन्मतःच बाळाचे रडणे आईला आणि जवळ असलेल्या कुटुंबातील सदस्यांना सुखावणारे असते. मात्र, नुकतेच जन्माला आलेले बाळ जेव्हा रडत नाही तेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. पायलने गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र बाळ रडत नसल्याने सर्व धास्तावले. अशा नाजूक परिस्थितीत सावंगी रुग्णालयातील नवजात शिशुरोगतज्ज्ञांनी केलेल्या अद्यावत, अनोख्या व कौशल्यपूर्ण उपचारप्रणालीने बाळाला मिळालेले जीवनदान सर्वांना आनंद देऊन गेले.
सध्या शिरोड, तालुका मिरज, जि. कोल्हापूर येथील रहिवासी असलेली पायल दीपक कांबळे ही बाळंतपणासाठी पुलगावला आपल्या माहेरी आली. या काळात वर्ध्यातील एका खाजगी रुग्णालयात नियमित तपासणी व औषधोपचारांकरिता तिची नावनोंदणी झाली. मात्र प्रसूतीसाठी दिलेल्या तारखेच्या पंधरा दिवस आधीच मध्यरात्री पोटात कळा येणे सुरू झाले. डॉक्टरांच्या सल्याने तिला सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात तातडीने रात्री २ वाजता भरती करण्यात आले. वेदना असह्य होत असल्याने रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला आणि पहाटेच्या दरम्यान पायलने एका गोंडस बाळाला जन्म दिला. शिशु जन्माचा आनंद व्यक्त करणे सुरू असतानाच बाळ रडत नसल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले.
आणखी वाचा-मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…
नवजात बाळाचे न रडणे हे त्याच्या जीवासाठी धोकादायक असल्यामुळे डॉक्टरांनी नवजात शिशुरोगतज्ज्ञांना लगेच पाचारण केले. बाळाला श्वास घेताना त्रास होत होता. प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थितरीत्या झाला नाही तर त्याचा घातक परिणाम मेंदू व हृदयावर होतो आणि ते जीवावर बेतण्याची शक्यता असते, याची जाणीव असल्याने तज्ज्ञांनी थेराप्यूटिक हायपोथर्मिया प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी बाळाला थंड पट्टीवर ठेवत कृत्रिम पद्धतीने श्वसनयंत्रणा सुरू करण्यात आली. सोबतच, सुरक्षित औषधोपचारही सुरू झाला. या अनोख्या व अद्ययावत उपचार प्रक्रियेत सहभागी नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. सागर कारोटकर, डॉ. रेवत मेश्राम, डॉ. महावीर लाक्रा, डॉ. राशी गुप्ता आणि डॉ. अदिती रावत यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले. सलग तीन दिवस २४ तास चाललेल्या डॉक्टरांच्या या कौशल्यपूर्ण व जीवनदायी उपचारांना तान्हुल्याने प्रतिसाद दिला आणि जन्मदात्यांसह डॉक्टरांच्याही जीवात जीव आला. या चिमुरड्या बाळाचे रडणे मोठ्यांच्या ओठांवर हसू फुलवून गेले.
आणखी वाचा-चंद्रपूर : मंदिरही असुरक्षित! तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
सावंगी मेघे रुग्णालयातून उपचार घेत सुखरूप घरी परतताना आई व वडिलांसह दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांचे आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. विशेष म्हणजे पायलला प्रसूतीसाठी सावंगी रुग्णालयातील सुमन कार्ड योजनेचा निःशुल्क लाभ मिळाला, तर बाळाचे उपचार शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेतून करण्यात आले. या पद्धतीच्या उपचार प्रणालीचा वापर फारच कमी प्रमाणात व क्वचित प्रसंगी होत असून सावंगी रुग्णालयात ही सेवा उपलब्ध असल्याचे डॉ. सागर कारोटकर यांनी सांगितले.