भारतीय जनता पक्षाने अमरावतीतून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारकडूनच विरोध करण्यात येत आहे. एवढचं नाही, तर आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात थेट उमेदवारही जाहीर केला आहे. बच्चू कडू यांनी ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांना प्रहार पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा घणाघात, “छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या…”
Raj Thackeray refrained from criticizing Aditya Thackeray in the Worli meeting Mumbai
वरळीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा नामोल्लेखही नाही! राज ठाकरे यांनी टीका करणे टाळले
Ramdas Athawale on Raj Thackeray
‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका
Uddhav Thackeray Chief Minister Career Public welfare works
दिखावा विरुद्ध सलोखा!

आज ( शुक्रवार, २९ मार्च) अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिनेश बूब यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली. दरम्यान, उमेदवारी मिळताच दिनेश बूब यांनी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. “यंदाच्या निवडणुकीत कोणाचा पराभव करायचा, हे अमरावतीतल्या जनेतेने आधीच ठरवले आहे. मात्र, खासदार कोणाला करायचे यासाठी अमरावतीत सक्षम उमेदवार नसल्याने प्रहार पक्षाने मला उमेदवारी दिली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

“जर जनतेने मला निवडून दिले, तर चुकीच्या माणसाला निवडून दिल्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही. अमरावतीकरांना अभिमान वाटेल, असे काम मी करेन. जिल्ह्याच्या हितासाठी आणि भावी पिढीसाठी आदर्श लोकप्रतिनिधी निर्माण व्हावा, यासाठीच मला उमदेवारी देण्यात आली आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – खासदार नवनीत राणांचा भाजपा प्रवेश, युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देताना अश्रू अनावर

दरम्यान, अमरावतीतून भाजपाने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय वंचित आघाडीने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमरावतीत काँग्रेस भाजपा आणि प्रहार यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.