‘भाजपने व्‍यवस्थित व्‍यूहरचना करून…’ बच्‍चू कडू पराभवानंतर म्हणाले, ‘येणारे दिवस आपलेच’

एक व्‍यवस्थित व्‍यूहरचना करून विरोधकांना मला पराभूत करण्‍यात यश जरी आले असले, तरी कार्यकर्त्‍यांनी खचून जाऊ नये, येणारे दिवस हे आपलेच आहेत, अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्‍ती पक्षाचे नेते बच्‍चू कडू यांनी व्‍यक्‍त केली आहे.

bachchu kadu and yashomati thakur reaction after loss assembly election 2024
यशोमती ठाकूर, बच्‍चू कडू (लोकसत्ता टीम)

लोकसत्‍ता टीम

अमरावती : या निवडणुकीत प्रचारकार्यात सहभागी झालेल्‍या सर्व कार्यकर्त्‍यांचे आणि मतदारांचे मी आभार मानतो. सर्व कार्यकर्त्‍यांनी आपआपल्‍या पद्धतीने मला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्‍न केले. एक व्‍यवस्थित व्‍यूहरचना करून विरोधकांना मला पराभूत करण्‍यात यश जरी आले असले, तरी कार्यकर्त्‍यांनी खचून जाऊ नये, येणारे दिवस हे आपलेच आहेत, अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्‍ती पक्षाचे नेते बच्‍चू कडू यांनी व्‍यक्‍त केली आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

अचलपूर मतदारसंघातून झालेल्‍या पराभवाविषयी बोलताना बच्‍चू कडू म्‍हणाले, माझी ओळख ही पदामुळे नाही, तर कार्यामुळे आहे. लोकसेवेचे कार्य आपण सर्व जण करतच राहू. कार्यकर्त्‍यांनी स्‍वत:ला एकटे वाटू देऊ नका. मी तुमच्‍यासोबत ताकदीने आणि मजबुतीने उभा राहील. आज जरी हरलो असलो, तरी उद्याचा दिवस आपलाच असेल. मला चार वेळा मतदारांनी जिंकून दिले आहे. त्‍यांचा मी आभारी आहे. काही चुका आमच्‍या निश्चित झाल्‍या असतील, काही चुकले असेल, काही कमी पडले असेल, त्‍याचा शोध घेऊ आणि पुन्‍हा लोकसेवेसाठी सज्‍ज होऊ.

आणखी वाचा-रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक यांचा विजयी चौकार, वाशीम व कारंजामध्ये नव्यांना संधी

नकारात्‍मक छाप सोडू नये- यशोमती ठाकूर

जरी या निवडणुकीत पराभव झाला असला तरी, आपल्या पाठिंब्यामुळे आम्ही या क्षेत्राच्या विकासासाठी आणि लोककल्याणासाठी अधिक जोमाने प्रयत्न करू. तिवसा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची समस्या आणि अपेक्षांचा आम्हाला आदर आहे, आणि त्या समस्यांचा योग्य निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव तयार राहू, आपल्या समर्पणासाठी, आपली एकजूट आणि आपला विश्वास हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आमच्या पराभवाने आपल्यावर कोणतीही नकारात्मक छाप सोडू नये, त्याऐवजी आपल्याशी अधिक चांगले संवाद साधून, आपल्या सर्वांच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळवू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्‍या नेत्‍या यशोमती ठाकूर यांनी व्‍यक्‍त केली आहे.

आणखी वाचा-‘अकोला पश्चिम’चा भाजपचा बालेकिल्ला ढासळला

आपला निर्णय सन्मान्य आहे, आणि आपण दिलेला मतदान हा आपल्या लोकशाहीतला एक महत्त्वपूर्ण हक्क आहे, जो प्रत्येक नागरिकाने पारदर्शकपणे व जबाबदारीने वापरला हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मतदाराने या निवडणुकीत आपला सक्रिय सहभाग दिला, हे आम्हाला समजून आणि जाणून आम्हाला एक प्रेरणा मिळाली आहे. निवडणुकीच्या या प्रवासात आपल्याला अनेक गोष्टी शिकता आल्या आणि आपले समाधान व अपेक्षांचे अधिक नीट समजून घेण्याची संधी मिळाली, असेही यशोमती ठाकूर यांनी म्‍हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bachchu kadu and yashomati thakur reaction after loss assembly election 2024 mma 73 mrj

First published on: 23-11-2024 at 20:40 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या