शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल आणि त्यांच्यामधला शिवसैनिक जिवंत असेल तर त्यांनी भाजपला मदत करणारे राजकीय पक्षातील एजंट कोण याचे नाव जाहीर करावे अन्यथा त्यांची स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेण्याची लायकी नाही अशा शब्दात आमदार बच्चु कडू यांनी राऊत यांच्यावर टीका केली. प्रहार आंदोलनाच्या निमित्ताने आमदार बच्चु कडू नागपूरमध्ये प्रसार माध्यांशी बोलत होते.

हेही वाचा >>>गडचिरोली : जमिनीच्या नियमबाह्य व्यवहाराला चाप बसणार काय?; भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे

BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?
Alleged irregularities in Zopu scheme demands inquiry into Murji Patel along with Akriti developers through petition
झोपु योजनेत अनियमितता केल्याचा आरोप, आकृती डेव्हलपर्ससह मुरजी पटेल यांच्या चौकशीची याचिकेद्वारे मागणी
BJP worker was stoned to death in Pavananagar in Maval
मावळातील पवनानगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून
Devendra Fadnavis, Nagpur Devagiri, Nagpur,
नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न

राजकीय पक्ष फोडण्यासाठी भाजपने दुसऱ्या पक्षातील आणि अपक्ष आमदारांना एजंट म्हणून नियुक्त केले, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, संजय राऊत यांनी एक तरी एजंटच नाव सागावे. त्यांनी केलेले आरोपबिनबुडाचे आहे. सध्या त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला आहे अशी टीका बच्चु कडू यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यवस्थित अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडली आहे. त्यामुळे राऊत यांनी प्रथम अभ्यास करावा आणि त्यानंतर बोलावे असेही कडू म्हणाले.