अमरावती : जिल्हा सहकारी बँकांची थकबाकी वाढत चालली असून सरकारने उपाययोजना न केल्यास बँका बुडतील, अशी भीती प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी बँकांची परिस्थिती मांडली. ते म्हणाले, सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. कर्जमाफी करताना आपली भूमिका सूस्पष्ट करावी. कारण या आधीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये जी कर्जमाफी झाली होती, यामध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकूण पात्र लाभार्थी ९७ हजार ८९२ होते. त्यांची एकूण रक्कम ४८७ कोटी होती. त्यापैकी बँकेला केवळ ७४ हजार ५१७ लाभार्थ्यांची कर्जमाफीचे ३१७ कोटी रुपये मिळाले आहेत. वंचित राहिलेले एकूण सभासद २३ हजार ३७५ असून त्यांची रक्कम १७० कोटी रुपये आहे.

Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!
Congress state president Nana Patole made serious allegations against state government
हे सरकार राज्य विकल्याशिवाय थांबणार नाही… नाना पटोले म्हणाले…

हेही वाचा >>>अखेर बस व चालकाचा परवाना निलंबित…विद्यार्थिनीचा बळी गेलेल्या अपघतात…

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना राबविण्यात आली होती. या योजनेत २ हजार ४६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडून बँकेला १९.३१ कोटी रुपये प्राप्त झाले, पण सामोपचार योजनेतील वंचित राहिलेल्या १ हजार ४५८ लाभार्थ्यांची ७८.१३ कोटी रुपयांची रक्कम येणे बाकी आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

दोन्ही योजनेमध्ये वंचित राहिलेली एकूण लाभार्थी संख्या ४५ हजार २१ असून त्यांची एकूण रक्कम २६९ कोटी येणे बाकी आहे. त्या प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना २०१९ मध्ये शासनाने प्रसिद्ध केलेल्या ग्रीन लिस्ट नुसार मंजूर केलेली लाभार्थ्यांची संख्या ४७ हजार ३३६ असून कर्ज रक्कम ३०६.१९ कोटी आहे. वंचित असलेली लाभार्थी संख्या २ हजार ५७८ असून त्यांची रक्कम ४८ कोटी एवढी आहे सदर योजनेमध्ये दोन लाखावरील घोषणा करण्यात आली परंतु परिपत्रक निघाले नसल्यामुळे या रकमेमध्ये सुद्धा सभासदाकडून बँकेला घेणे बाकी आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

‘वाडा’ आंदोलन करणार

सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचे भाव कमी होत आहेत. दुसरीकडे बियाणे, रासायनिक खते, शेणखताचे भाव वाढत जात आहे. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? असा सवालही कडू यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळावा, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, पीक नुकसानीचे पिक विम्याव्दारे भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी ‘वाडा’ आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला.

Story img Loader