राज्यात २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा दावा खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला होता. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना आमदार बच्चू कडू यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आज अमरावतीत प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – ठाकरे गटाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला गुंतवून…!”

Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

काय म्हणाले बच्चू कडू?

“संजय राऊतांना जेलमध्ये असताना एखादी मातामाय भेटली असेल तिच्याच सांगण्यावरून त्यांनी हे विधान केलं असेल, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी संजय राऊतांना लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांच्या मध्यावधी निवडणुकांच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली. या सर्व भूलथापा आहेत. राहिलेले आमदार फुटून शिंदे गटात जाऊ नये, यासाठी अशी विधाने केली जात आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: “जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांकडे राजीनामा देणं ‘नौटंकी’”, भाजपाच्या टीकेवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “संभाजी भिडे…”

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी एक मोठं विधान केले होते. “ शिंदे गट आणि भाजपाविरुद्धची लढाई संपलेली नाही. ही न संपणारी लढाई आहे २०२४ पर्यंत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. हे मी आजच्या दिवशी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.