अमरावती : प्रहार जनशक्‍ती पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे पक्ष सोडण्‍याच्‍या तयारीत असल्‍याची चर्चा सुरू असतानाच आमदार बच्‍चू कडू यांनी त्‍याविषयी प्रथमच भाष्‍य केले आहे. बच्‍चू कडू म्‍हणाले, भाजप-सेनेची ही व्‍यवस्थित खेळी आहे. असा प्रयत्‍न होऊ शकतो. राजकुमार पटेल प्रहार सोडून जिथे त्‍यांची राजकीय गणिते जुळतील, निवडून येण्‍यासाठी ते करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. अजूनही दोन-तीन महत्‍वाचे कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्‍याच्‍या विचारात असल्‍याचे मला कळले आहे. ते टाळता येत नाही, पण आम्‍हाला लढण्‍याची सवय झालेली आहे. आधी एकटाच होतो, आता एकटे राहू आणि पुन्‍हा एकाचे दहा करण्‍याची ताकद बच्‍चू कडू यांच्‍यामध्‍ये आहे.

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे दोन आमदार आहेत, त्‍यापैकी राजकुमार पटेल हे एक आहेत. लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी राजकुमार पटेल हे बच्‍चू कडू यांच्‍या सोबत होते, पण बच्‍चू कडू यांनी नुकतीच परिवर्तन महाशक्‍ती ही आघाडी स्‍थापन केली आहे. या माध्‍यमातून त्‍यांनी संपूर्ण राज्‍यात उमेदवार उभे करण्‍याची तयारी सुरू केली आहे.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

हे ही वाचा…पोटच्या लेकींना पित्याने नदीत फेकले

राजकुमार पटेल यांनी आज धारणी येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीच्‍या निमंत्रण पत्रिकेवर प्रहार पक्षाचे नाव, चिन्‍ह तसेच बच्‍चू कडू यांचे छायाचित्र नाही. केवळ मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासह राजकुमार पटेल आणि त्‍यांचे पूत्र रोहित पटेल यांची छायाचित्रे आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा…वादग्रस्त यादव कुटुंबीयांमध्ये पुन्हा वाद,तलवारी निघाल्या पोलिसांना …

राजकुमार पटेल हे प्रहार सोडण्‍याच्‍या तयारीत असल्‍याची चर्चा गेल्‍या अनेक दिवसांपासून सुरू आहे. बच्‍चू कडू यांनी आता त्‍यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. भाजप आणि शिवसेना जी खेळी खेळत आहेत, त्‍याचा फटका त्‍यांना विदर्भात बसेल, असा इशारा बच्‍चू कडू यांनी दिला आहे. प्रत्‍येकाचा राजकीय स्‍वार्थ असतो, त्‍यामुळे राजकुमार पटेल हे पक्ष सोडून जात असतील, तर त्‍याची आम्‍हाला पर्वा नाही. त्‍यांनी सुखात रहावे. आम्‍ही विचारांसोबत कधीही तडजोड केली नाही. आम्‍ही सुद्धा त्‍यांच्‍याशी मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्‍या विरोधात उमेदवार देऊ. एकनाथ शिंदे यांनी आम्‍हाला दिव्‍यांग मंत्रालय दिले, त्‍याचे ऋण कायम आहे, असेही बच्‍चू कडू म्‍हणाले.