अमरावती : चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांच्‍या नेतृत्‍वातील सहकार पॅनेलने वर्चस्‍व प्रस्‍थापित केले असून, शिंदे गटासोबत गेलेले आमदार बच्‍चू कडू यांच्‍या शेतकरी पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. सहकार व शेतकरी पॅनलच्या चुरशीच्या लढतीत बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे १२ संचालक, तर बच्चू कडू यांच्या शेतकरी पॅनलचे तीन संचालक विजयी झाले. काँग्रेस आणि प्रहारने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे, यांच्‍या सहकार पॅनलने तालुक्‍याच्‍या सहकार क्षेत्रावर आपली पकड अधिक मजबूत केल्‍याचे या निवडणुकीच्‍या माध्‍यमातून दिसून आले. बच्‍चू कडू यांनी सत्‍ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्‍यांच्‍यासाठी ही निवडणूक आव्‍हानात्‍मक आणि प्रतिष्‍ठेची होती. मात्र, त्‍यांना पराभवाचा धक्‍का बसला.

हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात धमक्यांचे तीन फोन आल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

हेही वाचा – Earthquake Breaking: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के; ३.१ रिष्टर स्केल तीव्रता

बबलू देशमुख यांच्‍या सहकार पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत विविध मतदान केंद्रावर प्रहार व सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. बहुतांश ठिकाणी सहकार व शेतकरी पॅनलमध्ये जयपराजयासाठी एका मताचा फरक होता. विजयी उमेदवारांमध्‍ये सहकार पॅनेलचे प्रताप किटुकले (२८), श्रीपाद आसरकर (२७), राजेंद्र खापरे (२७), कुलदीप सोनार (२७). शेतकरी पॅनलचे अनंत खुशालराव काळे (२७), प्रभाकरराव किटुकले (२७), साहेबराव नानाजी पोहोकार (२७) यांचा समावेश आहे. वैयक्तिक भागधारक मतदारसंघात सहकार पॅनेलचे आठही उमेदवार निवडून आले. त्‍यात सतीश गणोरकर (२१४१ मते), संजय गुजर (२०३०), रावसाहेब लंगोटे ( २१११), महिला राखीवमध्‍ये सुनिता काळे (२१५४), अनिता देशमुख (२१७०), विमुक्त जाती जमातीमध्ये विलास शेकार (२२२२), अनुसूचित जाती जमातीमध्ये श्रीकृष्ण वानखडे (२१५५), तर इमावमध्ये शिवाजी बंड (२२३८) यांचा समावेश आहे. वैयक्तिकमध्ये एकूण ५५८ मते बाद झालीत. मतमोजणीवेळी चोख पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. सहकार पॅनलने विजयाचा जल्लोष केला. यावेळी विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली.