नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये येऊन आंदोलन केल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजपसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीचीही कोंडी झाली आहे. बच्चू कडू यांचे हे आंदोलन त्यांचा जिल्ह्यातील राजकारण प्रवेशाचे संकेत देणारे आहे.

हेही वाचा- काय सांगता! चक्क चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश; वाचा कारण काय…

way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Forest Minister Ganesh Naik Navi Mumbai MIDC
नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक, वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
tiger path blocked loksatta news
नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…
nagpur municipal corporation launched ambitious plan to waive 80 percent of late fees on water tax bills
नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात

नागपूर जिल्हा सहकारी बँकेने नागपूर जिल्ह्यातील २६ कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव मंगळवारी करण्याचे ठरवले होते. हे शेतकरी काटोल तालुक्यातील नरखेड तालुक्यातील आहे. या भागाचे आमदार राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आहेत तर या भागाचे खासदार शिवसेनेचे कृपाल तुमाने आहेत. काटोल तालुक्यात भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे तर काँग्रेसचे अनेक नेत या भागात सक्रिय आहे. शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांकडे धाव घेत लिलाव रोखण्याची विनंती केली होती. प्रत्यक्षात कोणीच त्यांच्या मदतीला धावले नाही. अखेर शेतकऱ्यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी लिलावाच्याच दिवशी बँकेपुढे आंदोलन करून लिलाव रोखला. कडू हे शेजारच्या अमरावती जिल्ह्यातून ये तात. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. भाजपचे तीन आमदार जिल्ह्यात आहे, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहे. नेत्यांची मोठी फोज असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कडू यांच्याकडे धाव घ्यावी लागली त्यातूनच जिल्ह्यातील नेत्यांचे शेतकरी प्रेम दिसून येते, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कडूंच्या आंदोलनाने इतर पक्षांची चांगलीच कोडी झालेली आहे.

हेही वाचा- काँग्रेस अधिवेशनात कोणाला सहभागी होता येणार जाणून घ्या…

दरम्यान कडू यांच्या नागपूरच्या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात झालेल्या या आंदोलनाकडे कडू यांच्या प्रहार जनशक्ती या पक्षाच्या विस्ताराच्या नजरेने बघितले जात आहे. बच्चू कडू यांचे राजकीय कार्यक्षेत्र अमरावती जिल्हा आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी नागपूरच्या खासगी शाळांकडून होणाऱ्या अवाजवी शुल्क आकारणीवर लगाम लावण्याचा प्रयत्न केला होता. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने कडू सध्या पक्षबांधणीवर भर देत आहे. नागपूरच्या आंदोलनाकडे याच नजरेतून बघितले जात आहे.

Story img Loader