अकोला: दिवाळीमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने बडनेरा-नाशिक दिवाळी विशेष मेमू रेल्वे गाडी सुरू केली. या गाडीला रेल्वे प्रवाशांचा मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता बडनेरा-नाशिक मेमू रेल्वे गाडी नोव्हेंबर अखेरपर्यंत मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावेल.
सणासुदीच्या काळात रेल्वे गाडीमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता काही अतिरिक्त गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यामध्ये बडनेरा-नाशिक मेमू गाडी सुरू करण्यात आली.
हेही वाचा… ऐन गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; कारण काय…?
०१२११ बडनेरा-नाशिक विशेष व ०१२११ नाशिक – बडनेरा विशेष मेमू गाडीचा कालावधी १९ नोव्हेंबरपर्यंतच होता. या गाडीला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी कायम आहे. त्यामुळे आता बडनेरा-नाशिक मेमू गाडीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.