नागपूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनाही फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी छतरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धीरेंद्र शास्त्री यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्यातील वाद   दिवसेंदिवस वाढत असून हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा यात  उडी घेतली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या ‘प्रेत दरबार’ आणि ‘दिव्य दरबार’वर आक्षेप घेऊन अंधश्रद्धा पसरविल्याचा आरोप केला आहे. दिव्यशक्ती आणि चमत्कार सिद्ध करून दाखवल्यास ३० लाखांचे बक्षीस देण्याचे आव्हानही श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना दिले होते.

हेही वाचा >>> …तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी

त्यानंतर श्याम मानव यांना एका अज्ञात आरोपीने  एसएमएस पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी धीरेंद्र शास्त्री यांचे चुलत भाऊ लोकेश गर्ग यांच्या मोबाईलवर फोन करून धमकी देण्यात आली. ‘मी अमर सिंह बोलतोय…धीरेंद्र शास्त्रीच्या तेरवीची तयारी करून ठेवा’ अशी धमकी दिली आणि फोन ठेवला. या प्रकरणी लोकेश गर्गच्या तक्रारीवरून छतरपूर-बमिठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader