राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर देशाची राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर येत्या ६ ऑक्टोबरला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला पोलीस आयुक्तांनी परवागनी दिलेली नाही. आम्ही शांततापूर्ण मोर्चा काढून निषेध नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार वापरणार, अशी स्पष्ट भूमिका बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली.
हेही वाचा- नागपूर : विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात ‘अभाविप’चे आंदोलन
बेझनबाग मैदानावर ११ वाजता सभा घेण्यात येईल. त्यानंतर तेथून संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पोलिसांनी अद्यापतरी परवानगी दिलेली नाही. पण आम्ही मोर्चा काढणारच. पोलिसांनी मला जरी अटक केली तरी आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होईल, असा इशाराही दिला.
हेही वाचा- ‘अस्मिता योजने’ला घरघर ; मुली व महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
आम्ही शांततेने मोर्चा काढणार आहोत. परंतु, संघ परिसरातील काही संघटना यामध्ये गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर दीक्षाभूमीच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित राहण्याचे टाळले पाहिजे, असा सल्लाही दिला.