नागपूर : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यातील बहुजन समाज पक्षामधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला असून माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुंबईतील पक्षाच्या बैठकीत एका महिलेने थेट एका पदाधिकाऱ्यांच्या कानशिलात लावल्याने खळबळ उडाली.

याशिवाय नीमा मोहरकर, लता बांबोडे, अविनाश रंगारी, संजय रंगारी, रक्षित बारसागडे, रोशन गजभिये, शंकर भेंडारकर, विजय डहाट आणि राजेंद्र गजभिये यांच्याही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारयावा आणि पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष ॲड. परमेश्वर गोणारे यांना पदच्युत करण्यात आले होते.

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’

हेही वाचा : महावितरण ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील ग्राहकांना २७.७८ कोटी देणार..झाले असे की…

बसपाने महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पर्याय देण्याचा प्रयत्न केला. निळा झेंडा आणि हत्ती बोधचिन्ह याकडे आंबेडकरी जनता आकर्षित देखील झाली. विशेषत: विदर्भातील बसपाला लोकसभा आणि विधानसभेत आजवर एकही उमेदवारी निवडून आणता आला नाही. मात्र, काही जागांवर लाखभर मतांची बेगामी मिळाली होती. काही महापालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेत बसपाचे सदस्य आहेत. परंतु अलिकडे या पक्षाच्या मतांच्या टक्केवारी सातत्याने घरसण होत आहे. २०२४ लोकसभेत बसपाच्या उमेदवारांना अत्यल्प मतांवर समाधान मानावे लागले. कांशीराम यांची संघटनात्मक वीण सैल झाल्याचे दिसून येत आहे. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभर झाले असून आपसात भांडू लागल्याचे चित्र आहे.

मुंबईत बुधवारी बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत भंडारा जिल्हा प्रभारी सीमा रंगारी यांनी पक्षाचे प्रदेश प्रभारी माजी खासदार रामजी गौतम यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर बसपने ताजने यांच्यासह दहा पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ केले. त्यापाठोपाठ बसपने ताजने यांच्यासह दहा पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत एका महिलेने पक्षाचे प्रदेश प्रभारी व खासदार रामजी गौतम यांच्या कानशिलात लगावल्याने एकच गोंधळ उडाला होता. या बैठकीचा नूरच पालटला आणि पक्षातील दोन गट समोरसमोर आले होते. पक्षांतर्गत वाद यामुळे चव्हाट्यावर आला.

हेही वाचा : सर्व्हरमध्ये बिघाड: नागपूरच्या विमानसेवेवर परिणाम, आठ विमाने रद्द

बैठकीत पदाधिकाऱ्यांचे स्वागत सत्र सुरू असतानाच ही घटना घडली. या घटनेनंतर संबंधित महिलेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या महिलेने देखील पदाधिकाऱ्यांनी तिला मारहाण केल्याची तक्रार पोलिसात केली. स्वागतासाठी त्या मंचावर गेल्या. त्या गौतम यांच्याजवळ जाताच त्यांनी रागाच्या भरात त्यांच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभागृहातील अनेकांना धक्काच बसला. काही वेळ गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. रंगारी यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तर रंगारी यांनाही प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे व इतरांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पोलिसात नोंदवली.