तरूणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने इशारा मिरवणूक काढून. संविधान चौकात चक्क टेडी बिअर आणि शुभेच्छा पत्रे जाळली. व्हॅलेंटाइन डे साजरा करणा-या तरूण- तरुणींना पिटाळले. तरूणाई मंगळवारी व्हॅलेटाईन डे साजरा करीत असताना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने व्हॅलेटाईन डे ला विरोध करत छावनी येथून मिरवणूक काढली.
हेही वाचा >>> फडणवीस जे बोलले ते खरेच, असत्य बोलणार नाही – बावनकुळे
राणी दुगार्वती नगर, बालोद्यान, बॉटनिकल उद्यान, फुटाळा, रविनगर, लक्ष्मीभवन चौक, शंकरनगर, अलंकार टॉकीज , झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, टी पॉईट मार्गे संविधान चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकी दरम्यान व्हॅलेटाईन डे साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्या बजरंग दल, विहिप कार्यकर्त्यांनीह पिटाळून लावले.
हेही वाचा >>> चंद्रपूर :ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटर्सना ताडोबातील वाघांचे आकर्षण; हेडन व मार्क या दोघांना जुनाबाईसह दोन शावकांचे दर्शन
संविधान चौकात विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ विभागाचे मंत्री गोविंद शेंडे व बजरंग दलाचे ऋषभ अरखेल यांच्या नेतृत्वात टेडी बेअर व व्हॅलेटाईन दिवसांची शुभेच्छा पत्रे जाळण्यात आली. व्हॅलेंटाईन डे साजरा करणे ही पाश्चात्य कूप्रथा आहे. ती बंद करण्यासाठी व युवकाना भारतीय संस्कृती समजून सांगण्यासाठी ही इशारा यात्रा काढण्यात आली, असे गोविंद शेंडे यांनी सांगितले. यावेळी विदर्भ सहसंयोजक विशाल पुंज, शहर मंत्री प्रशांत मिश्रा, लखन कुरील, रजनीश मिश्रा, शुभम अरखेल आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.