अकोला : सापांविषयीचा गैरसमज, अंधविश्वास दूर होऊन त्यांच्या रक्षणासह समाजात जनजागृती करण्याचे अनमोल कार्य अकोल्यातील ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे गत अडीच दशकांपासून करीत आहेत.

या काळात त्यांनी तब्बल २० हजारांवर सापांना जीवदान दिले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यावर जीवघेण्या कर्करोगाने झडप घातली होती. कर्करोगाशी कडवी झुंज देतानाही त्यांनी सर्पसेवा अविरत ठेवली. कर्करोगावर मात केल्यावर आता ते निसर्गसृष्टीच्या संरक्षणासह समाजप्रबोधनाचे कार्यदेखील करतात. बाळ काळणेंनी कृतीतून समाजात आदर्श निर्माण केला आहे.

fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Injured Python yelikeli Akola , Python Akola district ,
VIDEO : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात विशालकाय अजगर जखमी; दोन तास शस्त्रक्रिया अन्…
Tadoba tiger, tiger bike video Tadoba ,
VIDEO : थरारक… वाघ दुचाकीसमोर आला अन् मग…
discrepancy in tiger death statistics
विश्लेषण : वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीमध्ये भारतात तफावत का? व्याघ्रसंवर्धनासाठी ते धोकादायक कसे?
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…

हेही वाचा – तेलंगणा एक्सप्रेसच्या पँट्रीकारमधून धूर, काय घडले नेमके? जाणून घ्या

सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. विषारी सापांपासून जीवाला धोका असल्याने त्याचा जीव घेण्याकडेच बहुतांश लोकांचा कल असतो. साप हा शेतकऱ्यांचा मित्र व निसर्गचक्राचा एक भाग आहे. याची जाणीव करून देत सापांच्या संरक्षणाचे कार्य सर्पमित्र बाळ काळणे गत २५ वर्षांपासून करीत आहेत. जीवनात काही तरी वेगळे करण्याचे ध्येय व निसर्गाची आवड यातून बाळ उर्फ जयदीप काळणे यांना सर्पसेवेची प्रेरणा मिळाली. स्वयंस्फूर्तीने त्यांनी साप पकडण्याची कला अवगत केली. निष्णात सर्पमित्र होत त्यांनी आतापर्यंत अत्यंत विषारी नाग, घोणस, मण्यारसह विविध प्रकारच्या सुमारे २० हजार सापांना जीवदान दिले. सापांना पकडून जंगलात सोडण्यासोबत त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्यावरही भर दिला. विद्याार्थी, शेतकरी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक यांना विषारी-बिनविषारी सापांची विविध कार्यक्रमांमधून माहिती दिली.

अनेक वेळा स्वत:चा जीव धोक्यात घालत सापांसोबतच अनेक वन्यप्राण्यांचाही त्यांनी जीव वाचवला. या कार्याची दखल घेऊन शासनासह विविध संस्था, संघटनांच्या असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मानद वन्यजीव रक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. सर्पसेवा, निसर्गसृष्टी व समाजसेवेसाठी आपले जीवन झोकून दिले असतानाच बाळ काळणे यांना कर्करोग सारख्या गंभीर आजाराने २०१८ मध्ये ग्रासले होते. जीभ आणि घशाचा कर्करोग झाल्याने जीव धोक्यात आल्यावरही परिस्थितीपुढेही खचून न जाता त्यांनी आपली सर्प व समाजसेवा अखंडितपणे सुरूच ठेवली. आजारांशी लढा देतानाच त्यांनी अनेक सापांना पकडून जंगलात सोडले. २०१९ मध्ये त्यांनी कर्करोगावर मात केली. ७९ टक्के अपंगत्व आल्यावरदेखील त्यांनी आपल्या कार्यात कुठलाही खंड पडू दिला नाही. कर्करोगावर जनजागृती करून रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे अनमोल कार्य ते पार पाडतात. समाज व निसर्ग सेवेप्रतिची बाळ काळणेंची तळमळ, जिद्द, चिकाटी व समर्पण भावना निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे.

हेही वाचा – मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्कात दुप्पट वाढ!; सामान्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती

५० अजगरांना वाचवले

सर्पमित्र बाळ काळणे यांनी चार मोठे अजगर एकाचवेळी एकाच ठिकाणी वाचवून आतापर्यंत एकूण ५० अजगरांना जीवदान दिले आहे. अशी कामगिरी करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव सर्पमित्र आहेत. अत्यंत दुर्मीळ अलबिनो सहा साप, चार ‘इंडियन एग इटर’, १२ मांडुळ साप आदींनाही त्यांनी पकडून जंगलात सोडले. यासोबत त्यांनी माकड, कोल्हे, काळविट, अस्वल आदींसह अनेक वन्यप्राणी व पक्ष्यांचे जीव वाचवले आहेत.

निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. निसर्गचक्राच्या संरक्षणाची प्रत्येकाची जबाबदारी आहे. जीवनात निसर्ग व सर्पसेवेचे ध्येय ठरवले. शेवटच्या श्वासापर्यंत सर्पसेवेचे आपले कर्तव्य बजावणार आहे. – बाळ काळणे, ज्येष्ठ सर्पमित्र, अकोला.

Story img Loader