बुधवारी रात्री उशिरा सापडले
नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील भारतीय सफारीला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या सफारीतील मादी बिबट गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता होते. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा ते कर्मचाऱ्याना दिसले. अफ्रि कन सफारीच्या कामाला अजून सुरुवातच झाली नसताना भारतीय सफारीतील हा गलथानपणा समोर आल्याने प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोरेवाडा प्रकल्पाची उभारणी वनविकास महामंडळाअंतर्गत करण्यात येत आहे. या उभारणीसाठी महामंडळाने एस्सेल वल्र्डसोबत भागीदारी के ली. ‘एफईजीझेड’ या कं पनीच्या माध्यमातून प्राणिसंग्रहालय साकारण्यात येत होते. मात्र, प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनापूर्वीच एस्सेल वल्र्डने अंग काढून घेतले. त्यानंतरही एस्सेल वल्र्डचे कर्मचारी या प्रकल्पात काम करत आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यापेक्षाही अधिक म्हणजे साडेतीन लाख रुपये के वळ या तीन कर्मचाऱ्यावर खर्च के ले जात आहेत. एस्सेल वल्र्डनेच भागीदारी काढून घेतल्यानंतर त्यांचे कर्मचारी येथे कसे, असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने उपस्थित के ला तेव्हा त्यांचा अनुभव आणि अमूल्य योगदानामुळे त्यांना कायम ठेवल्याचे महामंडळाने सांगितले. यातीलच एक दीपक सावंत यांना प्राणिसंग्रहालयाचे अभिरक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. महामंडळ प्रशासनाला एस्सेल वल्र्डच्या कर्मचाऱ्यावर एवढा विश्वास आहे आणि त्यासाठी त्यांच्या वेतनावर लाखो रुपये उधळले जात आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून पिंजऱ्यात परत न आलेल्या मादी बिबट्याची जबाबदारी कु णाची, आठ दिवसांपासून मादी बिबट पिंजऱ्यात परत आले नाही तर प्राणिसंग्रहालयाच्या अभिरक्षकाने त्याला शोधण्यासाठी कोणती पावले उचलली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. आताही बुधवारी महामंडळाच्या कर्मचाऱ्यामुळेच या मादी बिबटला शोधण्यात यश आले. अभिरक्षकाच्या वेतनावर महामंडळ हजारो रुपये उधळत असताना प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची जबाबदारी मात्र त्यापेक्षाही कमी वेतनावर काम करणारे महामंडळाचे कर्मचारीच सांभाळत आहेत.
नवीन प्राण्यांच्या सुरक्षेबाबतही शंका
प्राणिसंग्रहालयातील भारतीय सफारीत ‘राजकु मार’ हा वाघ आणि ‘ली’ ही वाघीण सोडण्यात आली आहे. याशिवाय पाच मादी बिबट आणि दोन नर बिबट, सहा अस्वल तसेच सांबर आणि निलगाय आहेत. बचाव केंद्रातील दोन वाघीण तसेच दोन अस्वल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणी उद्यानात स्थानांतरीत करण्यात आल्यानंतर त्या मोबदल्यात उद्यानाकडून दहा ‘अल्बिनो’ काळवीट, दहा काळवीट, चार सांबर, २० भेकर देण्यात आले. त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर त्यांना सफारीत सोडण्यात येणार आहे. मात्र, या घटनेनंतर वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न
प्राणिसंग्रहालयाची जबाबदारी ही अभिरक्षकाची असताना, अभिरक्षक दीपक सावंत यांनी मात्र मला याबाबत काहीही बोलण्याचे अधिकार नाही, असे सांगून हात वर के ले. मात्र, महामंडळाच्या कर्मचाऱ्यामुळे बिबट्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी बिबट मिळाल्याचा संदेश मात्र के ला. या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महाव्यवस्थापक ऋषिके श रंजन यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.