नागपूर: अधिवेशनाचे पाच दिवस लोटले आहेत. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी मदतीसाठी सरकारकडे आशेने बघत आहे, अशी माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धिमध्यमांशी बोलतांना दिली.
थोरात पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे लहान कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान वर्षभरही भरून निघू शकणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मदत नको तर भरीव मदतीची गरज आहे.
हेही वाचा… “आरक्षणावरून भाजपाने लावलेली आग सामाजिक कलंक…” नाना पटोलेंची टीका; म्हणाले…
राज्यसभेत निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबतचे विधेयक मंजूर झाले आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, सरकार सर्वच सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढवीत आहे. त्याचे परिणाम चुकीचे आहेत. या अधिवेशनानंतर लोकसभेची तयारी सुरू होईल. त्यासाठी सगळ्याच पक्षांच्या बैठक आणि इतर सत्र सुरू होणार असल्याचेही थोरात म्हणाले.