लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याने खबळळ उडाली आहे. आचल प्रमोद गोरे (२३) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळचे रहिवासी आहे.

आचल ही येथील विमलादेवी मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसच्या चौथ्या वर्षांची विद्यार्थीनी होती. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेली. आज, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता तिच्या रूममेटने तिला उठवले.

आणखी वाचा-भाजप आमदारांच्या मतदारसंघासाठीच सरकारी योजना आहेत का? बांधकाम कामगारांसाठी देशमुखांचा मोर्चा

पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने वॉर्ड बॉय साहिल दसोडे याला मदतीसाठी बोलावले. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा शासकीय रूग्णालय दाखल केले असता, डॉक्टरानी तिला मृत घोषित केले. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bams student died during sleep in the hostel rsj 74 mrj