लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : सध्या स्थानिक बाजारपेठेत केळीला ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत असताना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवा मार्ग निवडला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील उत्सव उद्योजक समुहाचे प्रवीण नेमाडे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या उत्सव उद्योजक समूहाच्या माध्यमातून नुकताच वीस टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना झाला. दुबईकरांना अंजनगाव सुर्जीची दर्जेदार केळी पसंतीस उतरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.
आणखी वाचा-शस्त्राच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण, सिनेस्टाईल घटनेमुळे अकोल्यात खळबळ
अंजनगावसुर्जी तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते परंतु, भावाच्या अस्थिरतेमुळे येथील शेतकरी अडचणीत सापडतात. स्थानिक पातळीवरील भाव आणि आंतरराष्ट्रीय दर यांच्यात मोठी तफावत बघायला मिळते. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात जर केळी न्यायची असेल तर शेतमालाचा दर्जा चांगला असायला हवा. आंतरराष्ट्रीय मानकानुसार तो असायला हवा. यासाठी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने उत्सव उद्योजक समुहातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मालाचा दर्जा पाहून प्रती क्विटलमागे दोनशे रुपयाचा अतिरिक्त फायदा होत आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातून नुकताच रवाना झालेला केळीचा कंटेनर हा दुबई आणि नेपाळला गेला असून यासाठी टी. क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमोल हेंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रवीण नेमाडे यांना त्यांचे वडील देविदास नेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ते तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाते कंटेनरला रवाना करताना देविदास नेमाडे, प्रवीण नेमाडे, कमलेश पटेल, अमोल हेंड, प्रणीत कुबडे, उमेश पटेल, दिलीप नेमाडे, गौरव नेमाडे, आशिक अन्सारी, विनोद खारोडे, काशीनाथ राउत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
आणखी वाचा-चंद्रपूर : उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव, काय आहे प्रकरण जाणून घ्या…
शेतकऱ्यांनी दर्जेदार माल आपल्या शेतात तयार केल्यास त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळू शकतो. आर्थिक सुबत्ता आपण मिळवू शकतो. यामध्ये शेतकऱ्यांनी सातत्य ठेवणे आवश्यक आहे. उत्सव समुह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असेल. -प्रवीण नेमाडे, उत्सव समूह, अंजनगाव.