वाशीम : जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे एका युवकाने इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज १६ जानेवारी रोजी मालेगाव आणि रिसोड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला तर मंगळवार १७ जानेवारी रोजी वाशीम शहर बंद ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका समाजातील युवकाने व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने शिरपूर येथे दोन गटात वाद उफाळून आला होता. त्यानंतर शिरपूर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन्ही समाजातील नागरिकांची शांतता समितीची बैठक घेऊन पोलीस विभागाकडून शांतता बाळगण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र घेटनेचे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरत चालले असून शिरपूर जैन येथे कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर आज १६ जानेवारी रोजी मालेगाव व रिसोड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला असून उद्या १७ जानेवारी रोजी वाशीम बंद पाळून त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. माळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.