नागपूर: काँग्रेस नेते सुनील केदार यांना जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली. ते सध्या तुरुंगात आहेत. एक धडाडीचा नेते अशी प्रतिमा असलेल्या केदारांचे असंख्य समर्थक यामुळे हळहळले. संकटाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा संदेश देणारे फलक युवक काँग्रेसचे नेते बंटी शेळके यांनी नागपूरमध्ये लावले असून त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सुनील केदार जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते मानले जातात. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांवर त्यांची पकड आहे. त्यांच्यासारखा नेते तुरुंगात राहणे आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला परवडणारे नाही. त्यामुळे जामिनासाठी तसेच शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून केदार यांच्यावतीने न्यायालयीन लढाई सुरू आहे. केदार यांच्या संकटाच्या काळात कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत हा संदेश देण्यासाठी युवक काँग्रेसचे नेते बंटी शेळके यांनी नागपूर व ग्रामीण भागात फलक लावले आहेत. त्यावर त्यांनी “कल भी आपके साथ थे, आजभी है और कलभी रहेंगे. सुख मे नाही, दुख मे आपके साथ रहेंगे” असे लिहिले असून त्यावर सुनील केदार आणि बंटी शेळके यांचे छायाचित्र आहे. नागपूरमध्ये नुकतीच काँग्रेसच्या स्थापना दिनी जाहीर सभा झाली. या सभास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरही केंदारांच्या समर्थनार्थ फलक लागले होते.
हेही वाचा – बुलढाणा : आंदोलन चिघळले! पोलिसांनी ट्रॅक्टर मोर्चा अडवला अन् संतप्त शेतकऱ्यांनी…
हेही वाचा – ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये वाहनांच्या दोन कि.मी. रांगा, प्रवाशांना फटका
राजकीय पक्षाच्या फाटाफुटींमुळे २०२२ आणि २०२३ हे वर्ष गाजले
केदारांना शिक्षा, काँग्रेसच्या स्थापनादिनी नागपुरात झालेली जाहीर सभा, तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांची जाहीर सभा या सरत्या वर्षातील राजकारणातील प्रमुख राजकीय घडामोडी ठरल्या. याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला बसणार आहे. तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांनी नागपुरात जाहीर सभा घेऊन विदर्भात वातावरण तापवण्याचे प्रयत्न केले होते. पण त्यांचाच पक्ष तेलंगणात पराभूत झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी थोडी कमी झाली.