नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. अनेक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीच्या आधारे परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतले. मात्र, प्रवेश निश्चितीचे पत्र यायला किमान एक महिना लागतो. प्रवेश निश्चितीच्या पत्राअभावी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अडचण येत आहे.
परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत २० जूनपर्यंत होती. ती मंगळवारी संपली. हा अर्ज करण्याआधी विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठात प्रवेश घेणे अनिवार्य असते. ज्या विद्यार्थ्यांचा परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांनाच यासाठी शिष्यवृत्तीठी अर्ज करता येतो. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता अजूनही झालेली नाही. तसेच काही विद्यार्थ्यांचे परदेशातील विद्यापीठाकडून निवडपत्र आलेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यात अडचण येत आहे. शासनाने याची दखल घेऊन अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कुलदीप आंबेकर यांनी केली आहे.
अडचण काय?
ज्या विद्यार्थ्यांचा परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश झालेला आहे त्यांनाच यासाठी शिष्यवृत्तीठी अर्ज करता येतो. मात्र, अनेक विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता अजूनही झालेली नाही. तसेच काही विद्यार्थ्यांचे परदेशातील विद्यापीठाकडून निवडपत्र आलेले नाही.