लोकसत्ता टीम
नागपूर : विदर्भ क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्माचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार असून त्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
अमरावती शहरात जन्मलेल्या जितेशने २०१३-१४ साली विजय हजारे चषकात विदर्भाच्यावतीने ‘अ’ दर्जाच्या सामन्यात पदार्पण केले. २०१५-१६ साली रणजी ट्रॉफीमध्ये जितेशचे पदार्पण झाले. २०१६ मधील आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सकडून जितेश खेळला होता.त्यानंतर जितेशने पंजाब किंग्स संघातर्फे आयपीएलमध्ये फलंदाजीत चमक दाखवली.
आणखी वाचा-ताडोबा प्रशासनाचे आवाहन; म्हणाले, ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आळा घाला
जितेशने आजवर शंभर टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये दोन हजारांच्यावर धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेतही भारतीय संघात समाविष्ट जितेश उत्तम खेळाचे प्रदर्शन करणार अशी अपेक्षा क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.