वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला आहे. काही मतदारसंघात पक्ष विजय प्रतिष्ठाचा करण्यात आला आहे. भाजपसाठी आर्वी पाठोपाठ देवळीची जागा फार मनावर घेण्यात आल्याचे दिसून येते.

गत निवडणुकीत अपक्ष उभे राहून दुसऱ्या क्रमांकावर आलेले पक्षनेते राजेश बकाने यांना उमेदवारी देत भाजपने रणशिंग फुंकले. आणि आता सर्व नेते येथे कामास लावले. खुद्द जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांना अधिकाधिक वेळ याच मतदारसंघात थांबण्यास सांगण्यात आले. येथे यावेळी इतिहास घडवायचा असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. स्वतःच्या मतदारसंघातील प्रचार सोडून ते देवळीत आदेश करून गेले आहे. कारणही तसेच मोठे. काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे हे यावेळी डबल हॅटट्रिक साधण्याचा दावा करतात. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या कांबळे यांना भाजप पराभूत करू न शकल्याचे मोठे शल्य आहे.

supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
All India Tribal Development Council urged not to vote for Nana Patole accusing betrayal
गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका, आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा
Kiren Rijiju criticized pm modi said PM Modi targets Congress
मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…
Amit Shah opposes Muslim reservation in Chhatrapati Shivaji Maharajs Maharashtra
छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शहा यांचा घणाघात
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
vile parle vidhan sabha election 2024
विर्लेपार्ले विधानसभा मतदार संघ: झोपड्यांचे पुनर्वसन, विमानतळ फनेल झोनसह अनेक समस्या ‘जैसे थे’, समस्यांकडे लक्ष देण्याची मतदारांची मागणी
maharashtra vidhan sabha election 2024 pune assembly constituency bjp brahmin jodo
‘कसब्या’तील धड्यातून पुण्यात भाजपचे ‘ब्राह्मण जोडो’

हेही वाचा…महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…

इतर तीन मतदारसंघात कमळ फुलले. मात्र देवळीत कमळ का उगवत नाही याचे उत्तर गवसल्यावर छुपा विरोध करणाऱ्या काही नेत्यांना चांगलीच तंबी देण्यात आली. वाकडे वागाल तर खैर नाही, असे सुधीर दिवे स्पष्ट करून चुकले. बावनकुळे यांनीही विशेष सभा बोलावून कामाला लागा. इतिहास घडवा, असे भाषणातून सांगून टाकले. देवळीचा मागास चेहरा दूर करण्यासाठी नवा अध्याय लिहा, असे आवाहन मतदारांना केले.

आमदार दरेकर, रामदास तडस, सुरेश वाघमारे, सुनील गफाट व अन्य नेत्यांनी काँग्रेस वर तोफ डागली. भाजपने अशी बड्या नेत्यांची फौज देवळीत उभी करतांनाच काँग्रेसचे रणजित कांबळे यांचे निवडणुकीचे डावपेच हाणून पाडण्यासाठी भक्कम तटबंदी केल्याचे दिसून येते.ईथे आमदार नसूनही युती शासनाने विविध कामे आणली. राष्ट्रीय महामार्ग दिला. यवतमाळ नांदेड रेल मार्गाचा थांबा दिला असे सांगत भाजप नेते हा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार पूर्वीच करून चुकल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे तसेच शेतकरी नेते किरण ठाकरे यांच्यावर मात करीत पुढे निघण्याचे आव्हान असलेले भाजपचे राजेश बकाने यांना पक्षाकडून सर्व ती मदत मिळत असल्याचे चित्र ही लढाई रंगतदार करणारी ठरत आहे.

हेही वाचा…‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…

प्रामुख्याने कुणबी, तेली, दलित आदिवासी मतदारांचे प्राबल्य असलेला व पूर्णतः ग्रामीण चेहरा असलेला हा मतदारसंघ आहे. येथे पक्षीय प्रभाव यापेक्षा उमेदवार कोण, यावर लढत रंगल्याचा इतिहास राहला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा फतवा कार्यकर्ते किती मनावर घेतात, हे पुढेच समजणार.