नागपूर : शरद पवार नेहमी डबल गेम खेळतात याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक घडामोडींचे दाखले देता येतील. त्यांचे बोलणे आणि करणे वेगळे असून यात त्यांचा हातखंडा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शेतातील जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने शेतमजुराचा मृत्यू; वणी तालुक्यातील घटना

बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले फडणवीस आणि शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यांचे छोट्या मोठ्या जाहिरातीवरून संबंध खराब होतील असे ते नाही. दोन्ही नेते विचारांनी प्रगल्भ नेते आहे. औरंगजेबाच्या बाबतीत ओवेसी, शरद पवार आणि बंटी पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांवर बावनकुळे यांनी टीका केली. ते म्हणाले, भारतात राहून पाकिस्तानचे गुणगाण करणाऱ्या शक्तींना उद्ध्वस्त केलेच पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकार अशा शक्तींना शोधून काढेल आणि जमिनीत गाढल्याशिवाय राहणार नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bawankule criticizes sharad pawar said sharad pawar plays double game vmb 67 ssb
Show comments