नागपूर : लष्करामध्ये रँक महत्त्वाची असते. संबंधित अधिकाऱ्याने परिश्रमपूर्वक आणि गुणवत्तेच्या आधारे ती प्राप्त केली असते. ती रँक म्हणजे गौरव असते. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करीत असताना त्या पदाची गरिमा ठेवून पदनाम योग्यप्रकारे वापरला जाणे आवश्यक आहे. अन्यथा त्या पदाचा अवमान होत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांचे नाव आणि पदनाम चुकीच्या पद्धतीने लिहण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या सचिवालयाने त्याबाबत सूचना दिल्या आहेत. सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांना आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी त्यांच्या नाव आणि पदनामाचे कशाप्रकारे उल्लेख करावे, याचे निर्देश देण्यात आले आहे.

हेही वाचा – समृद्धी महामार्गावर खासगी बसची टँकरला धडक; १२ प्रवासी जखमी

सेवेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख करताना त्यांची रँक आणि त्यांना प्राप्त सेवापदक नमूद केले गेले पाहिजे. (उदा. मेजर जनरल आणि परमसेवा विशिष्ट पदक). सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांच्या नावासमोर श्री, श्रीमती यासारखे कोणतेही संबोधन वापरण्यात येऊ नये. तर सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना रँक, प्राप्त पदक आणि कंसात निवृत्त असे लिहणे आवश्यक आहे. उदा. मेजर जनरल आणि परमसेवा विशिष्ट पदक (निवृत्त). तसेच अधिकाऱ्यांच्या नावासमोर श्री, श्रीमतीसारखे संबोधन लावणे चुकीचे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be careful when referring to the rank of military officers rbt 74 ssb