नागपूर: सौंदर्य फुलवण्यासाठी बरेच तरुण केस प्रत्यारोपण करतात. त्यासाठी डोक्याच्या मागील भागातील (डोनर भाग) शिल्लक केस घेतले जाते. परंतु ही प्रक्रिया तज्ज्ञांकडून करणे अपेक्षित आहे. परंतु या क्षेत्रातील कुठलाही अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण न घेतलेले केस प्रत्यारोपण करू लागले आहेत. त्यामुळे मागील भागातील शिल्लक केसही गमवावे लागू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केस प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. सुरेश चवरे म्हणतात,
केस गळती झालेल्या व्यक्तीला केस प्रत्यारोपणातून गेलेले सौंदर्य परत आणता येते. त्वचारोग तज्ज्ञाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमात केस प्रत्यारोपणाचे कौशल्य शिकवले जाते. टक्कल पडलेल्यांना डोनर भागातील केस काढून लावणे, केसांची सुरक्षित हाताळणी, केस क्षतीग्रस्त होऊ नये म्हणून काळजी, केस काढल्यास सहा तासांच्या आत विशिष्ट तापमानात लावणे, प्रत्यारोपणासाठी त्वचेवर अचूक आकाराचे छिद्र करणे यासह इतरही बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात.

हेही वाचा: नागपूर: धवनकरांच्या चौकशीनंतर आरोपपत्र!; कुलगुरूंनी खंडणी प्रकरणात मागितले स्पष्टीकरण

परंतु हल्ली केस प्रत्यारोपणात हातखंडा असलेल्या तज्ज्ञांकडे डोक्याच्या मागील बाजूचेही केस गेलेले काही रुग्ण नोंदवले गेले आहे. प्रत्यारोपण तज्ज्ञांनी रुग्णाकडून माहिती जाणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी अप्रशिक्षितांकडून केस प्रत्यारोपण केल्याचे सांगितले. असुरक्षीत रित्या डोनर भागातून केस काढल्याने तेथे संक्रमन होणे, नेक्रोसीस, व्रन येणेसह इतरही गुंतागुंत संभावते. त्यामुळे येथील केसांसह केसांच्या मुळांवर क्षती वा काही प्रकरणात शिल्लक केसही कळून येथेही केस न येण्याचाही प्रकार होत, असल्याचेही विदर्भ हेअर रिस्टोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश चवरे लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be careful with hair transplantation advice from dr suresh chavare nagpur news tmb 01