नागपूर : सप्टेंबरच्या अखेरीस मुसळधार पावसाने ठाण मांडले असतानाच आता ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – उद्या हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना, काय आहे इतिहास?

हेही वाचा – पूर ओसरला, पुनर्वसन मंत्र्यांनंतर आता कृषी मंत्री नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

या महिन्यात ‘ऑक्टोबर हिट’चा अनुभव येणार असून महाराष्ट्रातदेखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. देशात जुलै आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. देशात नैऋत्य मान्सूनमध्ये एकूण सरासरीच्या ९४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. भारतीय हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.