यवतमाळ : घाटंजी शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास एका अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील जंगल परिसरातून रात्री ९ वाजताच्या सुमारास हे अस्वल न्यायालय परिसरात आले. रात्री अस्वल बघायला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.
हेही वाचा >>> अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार या निव्वळ वावड्या – बाळासाहेब थोरात
अस्वल शहरात आल्याची माहिती पोलिसांसह वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे बचाव पथक परिसरात पोहोचले. त्यांनी अस्वलला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्वलाने धूम ठोकली. यानंतर लगतच्या घाटी गावात अस्वलाने प्रवेश केला. यादरम्यान बचाव पथकाला अस्वलाने अनेकदा हुलकावणी दिली. वनविभागाच्या पथकाने अथक परिश्रमानंतर शहरातील मोठ्या पुलाजवळ त्याला ‘ट्रॅग्यूलाईज’ करून पकडले.
हेही वाचा >>> लोकसभेसाठी भाजपचे ‘मिशन ४५’; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलढाण्यात
अस्वलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलात सोडणार असल्याचे वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले. अस्वल पकडण्यासाठी वनविभाग व पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्वल जेरबंद झाल्याने घाटंजीकरांनी सुटकेचा श्वास घेतला.