नागपूर: ‘सी-२०’ परिषदेनिमित्त नागपूरला सजावण्यात आले होते. परंतु वादळाने नागपुरातील फुटाळा परिसरातील सौंदर्यीकरणाला ग्रहण लागले आहे. सेल्फी पाॅईंटलाही फटका बसला. सी- २० चे फलकही उलटे झालेले दिसत आहे.
हेही वाचा – मधाच्या भाकरीसाठी नागझिऱ्यातील अस्वलांची भटकंती
नागपुरातील दोन दिवसीय सी २० परिषदेला देश-विदेशातील पाहूण्यांनी हजेरी लावली होती. परिषदेपूर्वी नागपुरातील विविध भागांना सजवण्यात आले. ठिकठिकाणी सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आले. तेलंखेडी उद्यानात पाहुण्यांसाठी जेवणाची विशेष सोय आणि फुटाळा तलाव परिसरात संगित कारंजे दाखवून मनोरंजनाचेही आयोजन होते. त्यामुळे फुटाळातील सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष दिले गेले. परिषदेनंतरही या सौंदर्यीकरणामुळे येथे पर्यटक गर्दी करत आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी शहरात वादळीवाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यात फुटाळा परिसरातील तलावाच्या पुलाजवळचे सेल्फी पाॅईंट कोलमडून पडले. तर विविध पथदिव्यांवर लावलेले जी- २० रोषणाईचे फलक उलटे झाले आहे.