नागपूर : करोनामुळे दोन वर्षानंतर होत असलेल्या ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर अँड लोकनृत्य महोत्सवात विविध राज्यातील कला संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या विविध राज्यातील कलांचा आणि क्राफ्ट मेळ्याचा आनंद नागपूरकर रसिकांनी घ्यावा, असे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने २९ व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर अँड लोकनृत्य महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे नागपूरचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत सत्यनाथन, केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, सहायक संचालक दीपक कुलकर्णी, सहायक संचालक (कार्यक्रम) गोपाल बेतावार उपस्थित होते. यावेळी डॉ. दीक्षित म्हणाले, केंद्राच्यावतीने होणाऱ्या या महोत्सवाची नागपूरकर वाट पाहत असतात.

हेही वाचा >>> ‘एमपीएससी’च्या हटवादी भूमिकेविरुद्ध आंदोलन, नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची मागणी

विविध राज्यातील कलावंत या महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि खऱ्या अर्थाने एकतेचे दर्शन या महोत्सवात दिसून येते. त्यामुळे या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राजस्थानच्या जुम्मेखान मेवाती यांच्या गायनाने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चिटकोर नृत्य (सुरेश घोरे व चमू नागपूर,), सोंगी मुखवटे (अंबादास गवळी व चमू, नाशिक, महाराष्ट्र), होजागिरी नृत्य (सुभ्रदीप श्याम व चमू आगरतळा, त्रिपुरा), काकसार नृत्य (सियाराम दुग्गा व चमू छत्तीसगड), बिहू नृत्य (स्वागता शर्मा व चमू दिब्रुगड, आसाम) आणि डांगी नृत्य (पवन बागुल, गुजरात) यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. राजस्थानची कच्छी घोडी (श्री हरिशंकर नगर आणि ग्रुप) देखील पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beautiful culture from all over the country in nagpur kaksar of chhattisgarh bihu of assam vmb 67 ysh
Show comments