नागपूर : शहरात गेल्या चार वर्षांत २२० तरुणी देहव्यापाराच्या दलदलीत लोटल्या गेल्या. यामध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींचा टक्का मोठा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ब्युटी पार्लर हे देहव्यापाराचा मुख्य केंद्र झाले आहेत. अनेक तरुणींना ब्युटीपार्लर, स्पा आणि मसाज सेंटरमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिला दलाल जाळ्यात ओढतात. काही दिवस काम केल्यानंतर महागडे मेकअपचे साहित्य आणि नवनवीन कपडे भेट म्हणून देतात. त्यानंतर हळूहळू त्यांना झटपट पैसा कमावण्याचे आमिष दाखवतात. त्यामुळे तरुणी देहव्यापाराकडे आकर्षित होतात. या तरुणींचे बाहेर पडण्याचे रस्ते बंद होतात. मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापार उपराधानीत होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांत गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाने १०२ अड्ड्यांवर छापे घालून २२० मुली, तरुणी आणि महिलांना ताब्यात घेतले. जवळपास ३६३ आरोपींवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये सर्वाधिक महिला आरोपींचा समावेश आहे.
वादग्रस्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक संबंध
ब्युटी पार्लर, मसाज-स्पा सेंटर, पंचकर्म, पब, हॉटेल्स, फार्महाऊस आणि काही सदनिकांमध्ये देहव्यापाराचे अड्डे चालतात. अनेक दलाल गुन्हे शाखेच्या एसएसबीतील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात. पूर्वी भूषण-अनिलची जोडी चर्चित होती. आता त्यांची जागा नव्या जोडीने घेतली आहे.
हेही वाचा…धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
आकडे काय सांगतात?
वर्ष गुन्हे दलाल तरुणी मुली
२०२० २७ २२४ ५५ ०९
२०२१ ३४ ६१ ६८ ०७
२०२२ २१ ३६ ३६ ०६
२०२३ ४८ २८ ४९ ०७
२०२४ (मार्च) ४ १४ १२ ००