नागपूर : नागपूर-दुरान्तो एक्सप्रेसमध्ये यापुढे इतर रेल्वेगाड्याप्रमाणे तिकीट भाड्यातच ‘बेडरोल’ मिळणार आहे. ही सुविधा २५ फेब्रुवारीपासून उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – गोंदिया : कॉन्व्हेंट संचालकाच्या मुलाची विद्यार्थिनींना अमानुष मारहाण, पालकांचा संताप अनावर

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

करोनाच्या काळात रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते मुंबई दुरान्तो एक्सप्रेसमधील चादर, उशी, ब्लँकेट पुरवण्याचे कंत्राट खासगी कंपनीला दिले होते. हा एक वर्षांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून रेल्वेने हाती घेतला होता. प्रवाशांना अडीचशे रुपयांत या वस्तू खरेदी कराव्या लागत होत्या. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्याबाबत रेल्वेकडे खूप तक्रारी आल्या आहेत. रेल्वे प्रवास भाड्यात या सुविधा देण्याचे ठरले असताना करोना काळात सुरू केलेला हा पथदर्शी प्रकल्प २४ फेब्रुवारी २०२३ ला गुंडाळला होता. आता इतर गाड्यांप्रमाणे दुरान्तो एक्सप्रेसमध्ये वातानुकूलित डब्यातदेखील प्रवास भाड्यात चादर, उशी आणि ब्लँकेट मिळू शकणार आहे.