गोंदिया: शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला असून, एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे, तर ५ शेतमजूर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गावात उघडकीस आली.

सुमन आनंदराव आमडे असे मृत महिलेचे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले (६५) असे दोघां मृताचे नाव आहेत. अंकित लक्ष्मीचंद पटले (२७), ग्यानीराम उईके (५७), माया आमडे (४२), अशी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये मंदा आमडे (४२), प्रमिला चौधरी (३०) यांचा समावेश आहे. सर्व कुऱ्हाडी गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात मधमाशांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे याआधीही कुऱ्हाडी येथील शिक्षक श्रावण कुंभारे यांचाही अशाच मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’

हेही वाचा… प्रेयसीला तिचा पती मारत असल्याचे खटकले म्हणून प्रियकराने…

जिल्ह्यात सद्या सर्वत्र भात लावणीचे काम सुरू आहे. शेतकरी व शेतमजूर सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतात काम करत आहेत. कुऱ्हाडी येथील रहिवासी शेतकरी लक्ष्मीचंद पटले यांच्या शेतात भात लावणीचे काम सुरू असताना वरील शेतमजूर भात लावणीचे काम करुन सायंकाळी एकत्र होऊन परतत असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेत लक्ष्मीचंद पटले, त्यांचा मुलगा अंकित पटले व माया आमडे, मंदा आमडे, प्रमिला चौधरी, ज्ञानीराम उईके हे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा… अकोला: चुलत बहिणीवर लादले मातृत्व, भावाला…

सर्व जखमींना गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र उपचारादरम्यान सुमन आमडे यांचा रात्री उशिरा,तर लक्ष्मीचद पटले यांचा पहाटे ४ च्या सुमारास मृत्यू झाला, तर लक्ष्मीचंद पटले यांचा मुलगा अंकित पटले हा पण गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर गोंदियातच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर व इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली व शासकीय योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा… नागपुरात काय सुरू आहे ? खंडणी दिली नाही म्हणून दुकानदारावर गोळीबार

मधमाशांचा हल्ला हा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत बसत नाही पण आणखी कोणत्या शासकीय योजनेत हे बसवून मृतांच्या नातेवाईकांना मदद मिळावी असे प्रयत्न आमचे राहणार असल्याचे गोरेगांव चे तहसीलदार नागपुरे यांनी सांगितले.