लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : कारागृहात शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या गुन्हेगाराने पैशासाठी एका भिक्षेकऱ्याची हत्या केली. ही घटना रविवारी गोलबाजार परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीस अटक केली. मधुकर गंधेवार (६५, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड), असे मृताचे तर अजय शालीग्राम, असे आरोपीचे नाव आहे.

शालीग्राम हा दोन सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून सुटला होता. गावाला परत जाण्यासाठी पैसे नसल्याने तो गोलबाजार परिसरात फिरत होता. गोलबाजार परिसरात त्याने मधुकर गंधेवार या भिक्षेकऱ्याकडून पैसे हिसकावले. त्याने प्रतिकार केला असता आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात गंधेवार यांचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा-वर्धा जिल्ह्यात मुसळधार! एक म्हैस ठार, जनजीवन ठप्प

त्याच्याकडून पैसे हिसकावून आरोपी पळून गेला. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासानंतर पोलिसांनी काही तासांतच अजय शालीग्राम याला अटक केली.