चंद्रपूर: गेल्या काही दिवसांत पावसामुळे रस्त्यांची पोलखोल झाली आहे, ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे रोज गंभीर किरकोळ अपघात होत आहेत, तर यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून प्रशासनाला जाग येण्यासाठी वारंवार मनसेकडून अभिनव आंदोलन करीत रस्त्यांचे काम करण्यास भाग पाडले, परंतु प्रत्येक वर्षी आंदोलन केल्यावरच जाग येतो याचा आक्रोश करीत बुधवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कार्यकारी अभियंता कार्यालयात आंदोलन केले.
बुधवारी सकाळी जुनी पडोली रोडवरील वीचोडाजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात चारजण गंभीर झखमी झाले, तर मागील आठवड्यात बाबुपेठ येथे खड्ड्यांंमुळे ऑटोमधील सहा लोकांना जीव गमवावा लागला, या घटनेमुळे आक्रमक होत वारंवार तक्रार करूनही लक्ष न दिल्याने याला जबाबदार कार्यकारी अभियंता असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त झालेले कार्यकारी अभियंताचे कार्यालय गाठत त्यांना मनसेतर्फे उत्कृष्ट खड्डेसम्राट अभियंता पुरस्काराचे स्मृतीचिन्ह देत निषेध नोंदविला व त्यांचे शुभेच्छा देणारे सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोरील बॅनर फाडत आक्रोश व्यक्त केला.
यावेळी तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्याची मागणी यावेळी महाराष्ट्र सैनिकांना केली. भविष्यात अपघातात पुन्हा बळी गेल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर नोंद व्हावा यासाठी जनआंदोलन उभारू, असा दम यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, विधी व जनहित जिल्हाध्यक्षा मंजुताई लेडांगे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, विधानसभा संघटक मनोज तांबेकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, नितीन टेकाम, असलम शेख, विनोद रेब्बावार, मयूर मदणकर, करण नायर, सुयोग धनवलकर, चैतन्य सदाफळ, तुषार येरमे, बाळू शेवते, वर्षाताई भोमले, अनुप माथणकर, अविनाश रोडे, संतोष नागरकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.