अमरावती : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांवर कारवाईचे सत्र सुरू असले, तरी आरोपींचा वेगवेगळ्या क्‍लृप्‍त्‍या वापरून पोलिसांना गुंगारा देण्‍याचा प्रयत्न असतो. असाच एक प्रकार अमरावती शहरात समोर आला आहे.

राजापेठ पोलिसांनी शहरातील तापडिया मॉलमध्‍ये एका कोपऱ्यात बसून मोबाईलवर सट्टा घेणाऱ्या आरोपीला गजाआड केले आहे. रितेश राजकुमार रामरख्‍यानी (३४, रा. कृष्‍णा नगर, अमरावती) असे या सट्टेबाजाचे नाव आहे. राजापेठ पोलिसांचे पथक गोपनीय माहितीच्‍या आधारे गोपाल नगर चौकातील तापडिया मॉलमध्‍ये पोहोचले, तेव्‍हा रितेश रामरख्‍यानी हा एका कोपऱ्यात बसून मोबाईल अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून सट्टा घेत असल्‍याचे पोलिसांच्‍या निदर्शनास आले. पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले आणि चौकशी सुरू केली, तेव्‍हा त्‍याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, पोलिसांनी त्‍याच्‍या जवळील महागड्या सॅमसंग कंपनीच्‍या फोल्‍डेड मोबाईलची तपासणी केली, तेव्हा सर्व प्रकार समोर आला.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

हेही वाचा – नागपूर : प्रक्रिया न करता गोमूत्र वापरल्यास आरोग्याला धोका! आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. नंदिनी भोजराज यांची माहिती

मोबाईलच्‍या गुगल क्रोममध्‍ये ओस्टिन-७७७ डॉट कॉम या नावाचे बेकायदेशीर सॉफ्टवेअर आढळून आले. त्‍याच्‍या मोबाईलध्‍ये आयपीएल क्रिकेट सामन्‍यांवर सट्टा घेण्‍याबाबत ध्‍वनिमुद्रणदेखील आढळून आले. बेकायदेशीर अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून तो जुगार चालवत असल्‍याचे पोलिसांच्‍या लक्षात आले.

हेही वाचा – नागपूर : आधी पंतप्रधान मोदींविरुद्ध आक्षेपार्ह विधान; आता ‘या’ प्रकरणात काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाला अटक

आरोपी रितेशच्‍या मोबाईल अ‍ॅपच्‍या खात्‍यात ३६ हजार रुपये जमा असल्‍याचे त्याने पोलिसांना सांगितले. दोन मोबाईल क्रमांकावर फोन करून सट्टा घेत असल्‍याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी त्‍याच्‍याकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.

Story img Loader