नागपूर: जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या काम सुरू असल्याने नागपूरहून मुंबई, पुणे आणि नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तीन दिवस रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ३ ते ६ डिसेंबर या काळात पुणे, मुंबई, अहमदाबाद, गोवाचा प्रवास करणार असणाऱ्यांची अडचण होणार आहे. ०११३९ नागपूर -मडगाव एक्स्प्रेस ३ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. १२११४ नागपूर -पुणे एक्सप्रेस, २२१३७ नागपूर- अहमदाबाद एक्सप्रेस, १२१०५ सीएसएमटी- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, ०११४० मडगाव-नागपूर एक्सप्रेस ४ डिसेंबरला धावणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस, १२११३ पुणे-नागपूर गरीब एक्सप्रेस, १२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस, १२१३९ सीएसएमटी- नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, २२१३८ अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस, ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, १२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस ५ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे. तर ६ डिसेंबरला १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा