ॉ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकांच्या भावना भडकवून मते मिळवण्याचे प्रयत्न होतील. समाजात फूट पाडणाऱ्या अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. देशात स्वार्थासाठी व प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी अनिष्ट शक्तींसोबत आघाडी केली जात असल्याची टीका त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता संघाच्या विजयादशमी सोहळय़ात त्यांनी केली.
हेही वाचा >>> संघाच्या दसरा मेळाव्यात स्वंयसेवकांचा प्रचंड उत्साह, सरसंघचालकांच्या भाषणातून पुढील कार्याची दिशा स्पष्ट
सोहळय़ाच्या सुरूवातीला सरसंघचालकांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन झाल्यानंतर भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, की देशात राजकीय स्वार्थापोटी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अनिष्ट शक्तींशी आघाडी करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आहे. अशा वेळी अशा अनिष्ट शक्तींना समाज किंवा देशाचे विभाजन करून पाहणाऱ्या अंर्तगत किंवा बाहेरील शक्तींची सहज साथ मिळते. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी स्वयंसेवक प्रयत्न करतील, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले. काही विनाशकारी शक्ती स्वत:ला सांस्कृतिक मार्क्सवादी म्हणतात. त्यांनी मार्क्सला १९२० मध्ये सोडले. त्यांचा जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार व संयम यास विरोध आहे. काही मुठभर लोकांचा संपूर्ण मानवजातीवर प्रभाव असावा म्हणून ते अराजकतेचा पुरस्कार आणि प्रचार-प्रसार करतात, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> राजकीय स्वार्थासाठी देशात अनिष्ठ शक्तींसोबत आघाडी, सरसंघचालकांची विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका
विविध भाषा, प्रांत, धर्म, जाती-पाती असलेला आपला देश मातृभूमीप्रती समर्पण, पूर्वजांबाबत अभिमान आणि एकसारखी संस्कृती या तीन घटकांनी एकत्र बांधला आहे. भारताबाहेर निर्माण झालेल्या श्रद्धा बाळगणाऱ्यांनीही या घटकांचा आदर केला पाहिजे, अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली. जी-२० परिषदेच्या यशस्वी आयोजनाबाबत त्यांनी केंद्र सरकारची स्तुती केली. आफ्रिकन महासंघाला जी-२०च्या सदस्यत्वासाठी भारताने घेतलेल्या पुढाकारामुळे आपला चांगुलपणा आणि मुस्तद्देगिरीचे दर्शन झाल्याचे गौरवोद्गार भागवत यांनी काढले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंकर महादेवन यांच्या पत्नी संगिता महादेव, अभिनेत्री प्राजक्ता माळी आदी उपस्थित होते.
संस्कृती वाचविण्यात संघाचे योगदान – महादेवन
प्रसिद्ध संगीतकार-गायक शंकर महादेवन विजयादशमी सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरस्वती वंदनाने त्यांनी भाषणाला सुरुवात केली. अखंड भारताचा विचार, येथील परंपरा, संस्कृती वाचवण्यात संघाचे मोठे योगदान आहे. भारत देश जर गीत असेल तर संघाचे स्वयंसेवक सरगम आहे, असे गौरद्वोगार महादेवन यांनी यावेळी काढले.
२२ जानेवारीला राममंदिर उद्घाटन
२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. त्यावेळी सर्वांनाच अयोध्येला जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने त्या दिवशी आपापल्या गावात असलेल्या मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन भागवत यांनी केले.
मणिपूर हिंसाचारावर भाष्य
मणिपूरमध्ये हिंसाचार घडत नसून घडवला जात असल्याचे डॉ. भागवत आपल्या भाषणात म्हणाले. मणिपूर हे सीमावर्ती राज्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मैतेई आणि कुकी समाज बराच काळ एकत्र राहिले आहेत. दशकभर शांत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक हिंसाचार कसा उफाळून आला? या हिंसाचारामुळे कुणाचा फायदा आहे? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.