गोंदिया : ६०० कुटुंब आणि २११६ एकूण लोकसंख्या असलेले गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतने “माझी वसुंधरा” अभियानासह शासनाच्या विविध योजनांची एक कोटी तीन लाख रुपये पेक्षा जास्त बक्षिसे जिंकून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला. या करिता युवा सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या कल्पक नेतृत्व आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे गावातील शिक्षित युवक व गावकऱ्यांनी घेतलेल्या अविरत परिश्रमाचे हे फलित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सालेकसा तालुक्यातील वाघ नदीच्या काठावर वसलेले भजेपार हे गाव पूर्णतः शेतीवर अवलंबून असून या गावातील लोक वर्षभर आपल्या शेतात राबतात आणि अनेक कार्यक्रम गावात आयोजित करतात. या गावात कोणतेही उपक्रम राबविताना अवघे गाव एका कुटुंबासारखे एकत्रित येते. सोबतच शासनाच्या योजनांची आव्हाने स्वीकारून शेवटपर्यंत परिश्रम घेतात. दरम्यान, या गावाला एका तरुण सरपंचांचे कल्पक नेतृत्व लाभले आणि गावकऱ्यांचे परिश्रम फळाला आले आणि भजेपार गाव शासनाच्या विविध योजनांचे पुरस्कार मिळवते.

हेही वाचा…जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यास मारहाण

भजेपार ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार आणि रक्कम

माझी वसुंधरा अभियान २०२३ राज्यस्तरीय उत्तेजनार्थ ५० लाख रुपये स्मार्ट व्हीलेज ५० लाख रुपये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरतील ३ लाख तर तालुकास्तरीय ६० हजार रुपये अशाप्रकारे एकूण एक कोटी तीन लाख ६० हजार रुपयांचे बक्षीस गावाने पटकाविलेले आहे.

हेही वाचा…‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका

भजेपार गावात चालविण्यात येणारे उपक्रम

मृत व्यक्तीच्या स्मृतीत तसेच बाळाच्या जन्माप्रीत्तर्थ स्वागतासाठी झाड लावले जाते. मागील ९२ आठवडे अखंडित रविवारची ग्राम स्वच्छता मोहीम सुरू आहे. हरित सण उत्सव साजरे केले जात असून जन्माष्टमी, गणेशोत्सवात मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलाव निर्माण करून केले जाते. संपूर्ण गावातून एकत्रित होणारे निर्माल्य खत निर्मितीसाठी वापरले जाते. ग्राम भजेपार हे आंतरराज्यीय महीला-पुरुष कबड्डी स्पर्धेसाठी गाव प्रसिद्ध आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यरत असून दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. भजेपार व माताटोला- नदीटोला असे दोन वाचनालय सुरू असून आजपर्यंत ४० पेक्षा अधिक मुले शासकीय नोकरीत लागले. डिजिटल ई-वाचनालय प्रस्तावित आहे. लोकसहभागातून गावातील तरुणांनी उद्यान तयार केले आहे. गावात नवोदय स्कॉलरशिप परीक्षा वर्ग वर्षभर निःशुल्क सुरू असतात . दहावी-बारावीच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे व जवाहर नवोदय मध्ये निवड झाल्यास तसेच शासकीय नोकरीत लागल्यास रोख बक्षीस व आई-वडिलांसह भजेपार गौरव पुरस्काराने गौरव केला जातो. येथील आरोग्य उपकेंद्राला “सुंदर माझा दवाखाना” पुरस्कार मिळाला असून शाळेत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नवनवे उपक्रम ही घेतले जातात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes sar 75 sud 02