नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. राजकीय नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करते आहे, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

हेही वाचा – “नाथाभाऊ मी असं कधी बोललोच नव्हतो” म्हणत देवेंद्र फडणवीसांनी लग्नाबाबतचा ‘तो’ विषयच मिटवला

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!

नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

“राज्यात १९९९ ते २०१४ दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. यादरम्यान, एकाही राजकीय नेत्याला अटक झाली नाही. मात्र, भाजपाचे सरकार आल्यानंतर ईडी, इनकम टॅक्स, सीबीआय आणि आता एसआटी सुरू झाली आहे. या राज्यात नेमकं चाललंय काय? आज सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात तपास यंत्रणांची चौकशी लावण्यात येत आहे. काही जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशी वाईट राजकीय खेळी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

हेही वाचा – “महिलांना मंत्रीमंडळात स्थान द्या” म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्ही…”

“अनिल देशमुखांना कारण नसताना १४ महिने जेलमध्ये राहावं लागल. त्यांना आता आयुष्यभर समाजासमोर, कुटुंबियांसमोर, लोकांसमोर, जनतेसमोर आणि स्वत:च्या मनासमोर अपराधी भावनेनं वावरावं लागेल. कोण तो परमवीर सिंग आणि सचिन वाझे? त्यांनी काही तरी हवेत आरोप केले म्हणून एखाद्या मंत्र्यांला अटक करायची का? ही कोणती पद्धत आहे?” असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घाबरू नका, उरलेले आमदार…”, अजित पवारांची शिंदे-फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी

“१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले, मात्र २०२१ साली तुम्हाला नवाब मलिक दाऊदचे हस्तक दिसतात का? तोपर्यंत ते दाऊचे हस्तक होते? हे तुम्हाला माहिती नव्हतं का? आजपर्यंत ज्या लोकांवर तुम्ही ईडीचे छापे टाकले, ज्याच्या संपत्ती तुम्ही जमा केल्या, त्यांच्यावर कितीतरी आरोप लावले. मात्र, ते लोकं जेव्हा तुमच्या बाजुला येऊन बसले तेव्हा स्वच्छ झाले का?” असा प्रश्नही त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला विचारला.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात महात्मा गांधींच्या खुन्याचं उदात्तीकरण” फोटो दाखवत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून शिंदे सरकारवर टीकास्र सोडले. “कायदा सुव्यवस्थेचा विचार केला, तर एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या सहा महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर येतो. राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. याचाच अर्थ राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण किती वाढले आहे, हे लक्षात येईल. तसेच राज्यातील गुन्ह्याचं प्रमाण बघता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो. हे अत्यंत चिंताजनक आहे. याचाच अर्थ राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, हे स्पष्ट होतं”, असेही ते म्हणाले.