कृष्ण विसर्जनाकरिता एका छोट्या नावेने वैनगंगा नदीपात्रात जाणे ६ जणांच्या जीवावर बेतले असते, मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी!’, या म्हणीप्रमाणे ते थोडक्यात बचावले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या खमारी बुटी गावात घडली.

कृष्णभक्तांना घेऊन जाणाऱ्या या छोट्या नावेत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. नदीपात्रात गेल्यावर ही नाव उलटली. नावेतील सहा जण पाण्यात बुडाले. दरम्यान, आजुबाजूला असलेल्या नावाड्यांनी त्यांना वाचविले.

हा संपूर्ण थरार एका भाविकाने कॅमेऱ्यात टिपला. या घटनेची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या सहा जणांना भगवान कृष्णाने वाचविल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहे.

Story img Loader