भंडारा : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी २९ एप्रिल रोजी भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले . शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता जलाराम मंगल कार्यालय चौक येथून या निषेध मोर्चाला सुरवात होत गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक ते नगर परिषद समोर गांधी चौक येथे पोहचेल. गांधी चौक येथे पोहचताच मोर्चाचे रूपांतर श्रद्धांजली सभेत करण्यात येईल.
पहलगाम येथील दहशतवादी हल्यात शाहिद झालेल्या २७ पर्यटकांना श्रद्धांजली अर्पित कण्यात येईल. या मोर्चात सामील झालेल्या नागरिकांद्वारे आपल्या मोबाइलचे टॉर्च सुरू करून निषेध व्यक्त केला जाईल. जास्तीत जास्त संख्येत या निषेध मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच भंडाऱ्यातील व्यापाऱ्यांनी ४ वाजता नंतर दुकाने बंद करुन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज भंडारा व आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या यांच्या वतीने करण्यात आले आहे.