भंडारा : कायद्याने विवाहाचे वय बंधनकारक केले असेल तरी आजही ग्रामीण भागात याबाबत पाहिजे तशी जागरूकता दिसून येत नाही.अशाच एका प्रकरणात अल्पवयीन युवतीशी विवाह करून तिला गर्भवती करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी नऊ महिन्याची गर्भवती असल्याने नवरोबाला गोबरवाही पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुरुवार(दि.२७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गरोदर मातेच्या चाचण्या, वैद्यकीय तपासणी यादरम्यान पीडित मुलीचे बालविवाह झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले. अशावेळी कायद्याने मातृत्व चिकित्सा करण्याचे निर्बंध डॉक्टरांवर घातले आहे.प्रथम दर्शनी सदर गुन्ह्यात मुलीच्या पतीवर काय कारवाई करावी? याबाबत पोलीसही पेचात पडले होते. मात्र कायद्याच्या चौकटीत गुन्ह्याला पळवाट नसल्याने विवेक विनोद उईके (२०, बालाघाट मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कारवाई

सदरच्या गुन्ह्यात गोबरवाही पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार घटनेचे गांभीर्य राखले आहे. लग्नाच्या वेळी तथा नऊ महिन्यांची गर्भवती राहिलेली पीडिता घटनेच्या तारखेपर्यंत देखील अल्पवयीनच आहे. त्यात सध्या आरोपी नवऱ्याला ताब्यात घेतले असून धार्मिक रीतीनुसार लग्न लावून देणाऱ्या दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांना पोलिस ताब्यात घेणार की नाही? यावर अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.