भंडारा : वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने पुकारलेल्या संपात भंडारा जिल्ह्यातील सर्व ७७५ अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले आहेत. तीन दिवसांच्या या संपादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास शहरावर ‘ब्लॅक आऊट’चे संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी एजन्सीची मदत घेण्याची तयारी वीज वितरणने चालवली आहे.
सरकार वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. या विरोधात महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तीनही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी आज, बुधवारपासून संपावर गेले आहेत. भंडारा जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे ७७५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. संपामळे विजेची समस्या उद्भवत असून भंडारा शहरातील बहुतांश भागासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पुढील तीन दिवस अंधारात तर काढावे लागणार नाही ना, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> अखेर अंधार दाटलाच!, उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित
वीज अधिकारी-कर्मचारी संपावर गेल्यामुळे कोणत्याही क्षणी विजेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी मेणबत्ती, कंदील जवळ ठेवावे, मोबाइल चार्ज करून घ्यावेत, पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात, असा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. संपामुळे शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. संपकाळात वीजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी खासगी संस्थेला सतर्क केले आहे. अडचण आल्यास आवश्यक तेथे दुरुस्ती केली जाईल. संपकाळात वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे अभियंता अधीक्षक राजेश नाईक यांनी केले आहे.